रूपे सुंदर सावळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिताहे ॥१॥ रुणझुण वाजवी वेणु । वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥ गोधने चारी हती घेऊन काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी । वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥ एका जनार्दनी भुलवी गौळणी । करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥
| रचना | - | संत एकनाथ |
| संगीत | - | श्रीधर फडके |
| स्वर | - | सुरेश वाडकर |

No comments:
Post a Comment