September 30, 2012

September 29, 2012

September 28, 2012

अनंत चतुर्दशी - पूजाविधी

 गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून  केले जाणारे हे व्रत आहे 




या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते.

अनंताची पूजा कशी करावी यासंबंधी माहिती इथे वाचा 








September 26, 2012

मोफत मोफत मोफत!!!!

श्री विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, यांनी पाठवलेला हा इमेल  इतरानांही उपयुक्त ठरु शकतो  यासाठी इथे देत आहे 

मोफत मोफत मोफत!!!!
खजिना मोफत, अगदी कसलेही श्रम न करता,
हाताला लागत असेल तर का बरे डल्ला मारू नये?
मराठी आधीच मधाळ आणि त्या भाषेत लिहिलेली पुस्तके वाचायला मिळणे म्हणजे
तर पर्वणीच .........................आणि तीसुद्धा मोफत.................
त्याहूनही मोठे सुख म्हणजे तुमच्या दारापर्यंत हजर.
बोला हे सुख कोण कोण अनुभवणार?

तुमची तयारी असेल तर कुसुमाग्रज प्रतिष्ठान तुमच्या मदतीला सदैव तयार आहे.
गेल्या काही वर्षापासून एक स्तुत्य अभिनव उपक्रम राबवला आहे.
१०० पुस्तकांची एक पेटी तुमच्या दरी येते.
तुम्हाला हवे ते पुस्तक घ्यायचे, वाचायचे आणि परत करायचे.
So simple & sweet!!!!

अरे विचार कसला करताय!!!
वाचायला सुरुवात करा.
वाचनसंस्कृती रुजवण्याचा हा एक स्तुत्य अपक्रम आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पुस्तकांपासून दुरावलो आहोत.
पण पब, बियर बार, डिस्को थेक दुथडी भरून वाहत आहेत आणि
ग्रंथालये ओस पडू लागली आहेत.
मल्टीप्लेक्स आणि हॉटेल्सना भेट द्यायला वेळ आहे.
पण ग्रंथालयांना भेट द्यायला आणि पुस्तकांना वाचायला वेळ उरला नाही.
अशा बेगडी व्यस्त दुनियेतून बाहेर पडून आपण सर्वजण ह्या उपक्रमास हातभार लावू.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान,

99 22 22 5777. vinran007@gmail.com

Nashik Arun Natu 98227 93366
Pune Sharvari Date 95610 94159
Thane Rashmi Joshi 98694 65144
Kalyan Dr Manju Rathod 98192 41910
Dombivali Sangeeta Tamhankar 97691 40579
Aurangabad Dr Anagha Patil 98220 97264
Baroda, Gujarath Milind Bodas 99980 04943

Starting Soon .......
Goregaon Mumbai Rucha Joshi 98206 46117
Kolhapur Anand Jawalkar 98503 84381
Satara Geeta Jathar 99606 97263

In Process .........................
Vileparale Mumbai Sanjay Pethe 98210 56005
Jalgaon Manoj Govindwar 82375 13242

September 25, 2012

नोकरीतील त्रास - उपाय



नोकरीत  वरिष्ठ  किंवा सहका-यांकडून  होणारा त्रास  कमी होण्यासाठी खालील उपाय श्रध्देने करावा

रोज स्नानानंतर  चिमूटभर साखर खिडकीतून बाहेर टाकावी. त्यानंतर  हातात तांब्याच्या पेल्यात थोडे पाणी घेऊन  त्यावर उजवा हात ठेऊन

' माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे व कार्यालयातील शत्रू  ' असे म्हणावे  व त्यानंतर

' ॐ  चिमी चिमी स्वाहा ! '  हा मंत्र सात वेळा म्हणावा आणि ते पाणी पिऊन टाकावे

तसेच ऑफीसमधे जाताना खिशात दररोज लसणाचा एक गड्डा ठेवावा.
( श्री विजय हजारी यांच्या पुस्तकातून साभार )

September 24, 2012

पंचायतन उपासना ..!!


आमचे फेसबुकवरील मित्र श्री देवदत्त जोशी  यांनी उपासनेबद्दल दिलेली ही उपयुक्त माहिती >
---------------------------------------------------------------------------- 
मानवी विकासात ..
बुद्धी, ज्ञान, लक्ष्मी, तेज आणि शक्ती
ह्या पाच तत्त्वांचीच आवश्यकता असते.

गणपती उपासना :- बुद्धीप्राप्ती साठी,

शिव उपासना :- ज्ञानप्राप्ती साठी,
हरी उपासना :- (विष्णू) लक्ष्मीप्राप्ती
साठी,
सूर्य उपासना :- तेजप्राप्ती साठी,
अंबा उपासना :- शक्तीप्राप्ती साठी.

खालील प्रमाणे प्रत्येक देवतांचा

नित्यनियमित जप केल्यास परम कल्याणच साध्य होईल.


गणपती मंत्र : -

॥ ॐ गं गणपतये नम: ॥

(रोज १०८ वेळा जप करावा.)


गणपती गायत्री :-

|| ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात ||

(रोज १० वेळा जप करावा.)


शिव मंत्र : -

॥ ॐ नमः शिवाय ॥

(रोज १०८ वेळा जप करावा.)

शिव गायत्री :-

|| ॐ तत्पुरुषाय विद्महे। महादेवाय धीमहि। तन्नो रुद्रः प्रचोदयात |

(रोज १० वेळा जप करावा.)

विष्णू मंत्र : -

॥ ॐ नमो नारायणाय ॥

(रोज १०८ वेळा जप करावा.)

विष्णू गायत्री :-

|| ॐ नारायण विद्महे, वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ||

(रोज १० वेळा जप करावा.)

सूर्य मंत्र : -

॥ ॐ भास्कराय नम: ॥

(रोज १०८ वेळा जप करावा.)

सूर्य गायत्री :-
|| ॐ आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य: प्रचोदयात ||
(रोज १० वेळा जप करावा.)


अंबा मंत्र : -

॥ ॐ श्री दुर्गाये नम: ॥

(रोज १०८ वेळा जप करावा.)

अंबा गायत्री :-


|| ॐ महादेव्यै विद्महे दुर्गायै धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ||

( रोज १० वेळा जप करावा.)


-- श्री देवदत्त जोशी . —

September 23, 2012

Motivational Quote of the Day

"A stumbling block to the pessimist is a stepping stone to the optimist."
Eleanor Roosevelt


September 22, 2012

देव दर्शन

काल गेलो होतो दर्शनाला. रात्री १० वाजता  चिंचपोकळीला उतरलो. स्टेशन गर्दीने  ओसंडून गेले होते. मुंबईत खरं म्हणजे  रात्री 'अप' च्या दिशेचा प्रवास म्हणजे आरामाचा  पण छ.शि. ट ला जाणा-या गाड्या भरभरुन वहात होत्या. दादर, परळ, करी रोड, चिंच पोकळी, भायखळा या स्थानकांना जत्रेचे स्वरुप आले होते. कालचा गणेशोत्सवाचा तिसराच दिवस. अजुनही अनेकांच्या घरी बाप्पा आहेत, आपापल्या गावातून अनेकजण परतायचे आहेत. तरीही भक्तांची गर्दी जाणवण्या एवढी होती . 
ठरल्यावेळी ऑफीसमधील  आम्ही सहकारी स्टेशनवर इंडीकेटरखाली जमलो आणि परळ बाजूच्या जिन्याने लालबागकडे निघालो. बाहेर पडताच वाटले सर्वत्र दिवाळी आहे. आजुबाजूच्या जून्या चाळीत ( ज्या काही शिल्लक आहेत त्यात ) सगळीकडे आकाश कंदील लावले होते, इमारती, रस्ते यावरील  रोषणाई  मन वेधून घेत होती. सर्वत्र उत्साह होता. यानिमित्याने गेल्या दहा वर्षातील मुंबईच्या वास्तव्यात पहल्यांदाच गणेश उत्सवातील रात्रीची मुंबई अनुभवायला मिळणार होती.  . पाच एक मिनिटात राजाच्या स्वागत कक्षापाशी पोहोचलो. आपण कोणी व्हिआयपी वगैरे नसल्याने अर्थात सामान्य लोकांना ' राजाचे '  दर्शन घेण्यासाठी असलेली रांग तेथे उभ्या असलेल्या पोलीस  मामांनी अगदी तत्परतेने दाखविली .
 हीच ती ' मुख दर्शनाची ' रांग . या रांगेत चालायला लागल्यापासून ते प्रत्यक्ष ' लालबागच्या राजाचे दर्शन ' घेऊन  तेथील स्वयंसेवकाने धक्का मारुन बाहेरचा रस्ता दाखवण्या पर्यंतचा प्रवास फक्त १५ मिनिटे. हा प्रवास फक्त अनुभवायचा. शब्दात न सांगता येण्यासारखा. 
लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन  तेथे जवळच असलेल्या मुंबईच्या राजाचे ( गणेश गल्ली )  दर्शन घेतले. पशुपतीनाथ मंदीराची प्रतिकृती आणि नेहमीप्रमाणे  अतीभव्य गणेशमुर्ती होती.
यानंतर तेजूकाया मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही करी रोड स्टेशन कडे मार्गस्थ झालो आणि रात्री पर्यंत घरी सुखरुप पोहोचलो.  हा सर्व ३-४ तासांचा सोहळा  कायमचा स्मरणात राहील असा . बोरकरांनी वर्णन केलेल्या कवितेतील या ओळीसारखी अवस्था सध्या आहे.

माझे सुख मोठे ,सुख मोठे
ठेऊ कळेना कोठे
माझे सुख मोठे  !!

September 20, 2012

साईबाबांची आरती










सौजन्य : तरुणभारत , खजाना पुरवणी

आरती श्री सत्यनारायणाची




सौजन्य : तरुणभारत , खजाना पुरवणी

महाराष्ट्रातील २१ गणेशस्थाने




१)  गणपतीपुळे  -   जागृत , स्वयंभू देवता

२)  दशभूजा गणपती , हेदवी  -  गुहागर पासून जवळ

) श्री सिध्दिविनायक , नांदगाव -  जिल्हा रायगड

४) श्रीबल्लाळ विनायक - मुरुड ( जिल्हा रायगड )

५) श्रीसिध्दिविनायक - प्रभादेवी , मुंबई

६)  श्री महागणपती  - टिटवाळा

७)  मंगलमुर्ती - चिंचवड  -  जागृत देवस्थान

८)  कसबा गणपती , पुणे  - ग्रामदेवता

९) श्री गणपती देवस्थान, सांगली  - सांगलीचे आराध्य दैवत

१०)  श्रीसिध्दिविनायक, तासगाव  ( सांगली)  - उजव्या सोंडेची  गारेची  
मुर्ती, नवसाला पावणारा गणपती

११) तळ्यातील गणपती ( सारसबाग, पुणे) 

१२) दिगंबर सिध्दिविनायक
- कडाव, तालुका कर्जत. प्राचीन मुर्ती, अत्यंतजागृत देवस्थान

१३) श्री महागणपती राजूर ( औरंगाबाद )  - भारतातील साडेतीन गणेश पीठांपैकी  हे पूर्ण पीठ , स्वयंभू गणेश

१४)  श्री मोदकेश्वर - नाशिक
१५)   माळीवाडा  गणपती  -  अहमदनगर  - १० फूट उंच, उजव्या सोंडेची मुर्ती

१६) श्री गणपती - सिताबर्डी , नागपूर

१७)  श्री चिंतामणी - कळंब ( यवतमाळ )  - जागृत देवस्थान

१८)  श्री विज्ञानगणेश  - राक्षसभुवन ( मराठवाडा )  जालन्यापासून  ३६ मैलावर, गोदावरी काठी , दतात्रयांनी स्थापना केली

१९) श्रीमहागणपती  - नवगण राजुरी ( बीड - मराठवाडा )

२०)  श्री सिध्दिविनायक - आंजर्ले  ( दापोली )

२१) श्री गणपती  - बाळगीर महाराजांचा मठ , नांदेड
- नवसाला पावणारा गणपती 


September 19, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥९॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥९॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥९॥





अर्थ : - प्रया मनाचा आराखडा मनाच्या आठव्या श्लोकापर्यंत काढला. आता आणखी भावी काळाचाही नवा विचार रामदासांनी पुढे ठेवला आहे. चैन करून पैसे उधळीत राहणारा मनुष्य, पुढल्या पिढीबद्दल बेफिकीर राहतो, बापाचे कर्ज मुलाला फेडावे लागते. आणि धर्माच्या सांगीप्रमाण

े मुलाचा हा उपकार अति कष्ट करून कोठेतरी या माणसाला फेडावा लागतोच. म्हणजे या जन्मात भोगलेली चैन म्हणजे एक तऱ्हेने तुम्ही पुढल्या पिढीचे कर्जच काढीत असता आणि ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला तिसऱ्या पिढीत जन्म घ्यावा लागतो. सुख आणि दु:खाचा खो खो खेदाचा गुणाकार होत राहतो. शेजाऱ्याचे कर्ज काढणे ही अति पापबुध्दी झाली. या अति स्वार्थाबुध्दीचे मंाजर डोळे मिटून दूध पिते, तेव्हां पुढल्या कष्टाचा बडा बडगा, भवितव्याच्या पोकळीत खडा राहात असतो. दुसऱ्या ओळीत ’ अतिस्वार्थवृत्ती’ चा आविष्कार रामदासांनी केला आहे! आणि म्हणून तिसऱ्या ओळीत म्हटले आहे की, जे दु:ख भोगाला आले, ते त्यावेळी भोगून न टाकणे हे वर्तन खोटे आहे. पुढे चौथी ओळ म्हणते, खोट्या कर्मामुळे मनासारखे होत नाही, आणि छोटे दु:ख टाळायला गेलो, तर मोठे दु:ख येऊन उभे राहते. एबर्टने म्हटले आहे, इच्छाभोगाने नव्हे तर इच्छेचा त्याग करूनच शांती मिळेल. आणि हा इच्छात्याग इतका निर्विकल्प असला पाहिजे की, संत तिरूवल्लर म्हणतात, ’ अशा त्यागी माणसांची स्तुतीसुध्दा करणे शक्य नाही, ज्याप्रमाणे आजवर मेलेल्या माणसांची संख्या सांगणे शक्य नाही’.

आजचे रुलिंग प्लॅनेट ( १९ सप्टेंबर, २०१२)

आज भाद्रपद शुध्द चतुर्थी   म्हणजेच गणेश चतुर्थी  !

 मंगलमुर्तीच्या कृपेने आपणा सर्वास सुख, समाधान,  समृध्दी लाभो ही त्याच्या चरणी प्रार्थना

मंगलमुर्ती  मोरया !


आजचे रुलिंग प्लॅनेट ( १९ सप्टेंबर, २०१२)

 वेळ लग्न स्वामी  नक्षत्र स्वामीराशी स्वामी दिन स्वामी
 ६.२१ ते ६.२९ बुध राहु शुक्र, केतू मंगळ , राहु
 ६.२७ ते ८.२७ बुध राहु शुक्र, केतूबुध
 ०८.२७ ते १०.३९ शुक्र, केतु राहु शुक्र, केतू बुध
 १०.३९ ते १२.५३ मंगळ्,राहु राहु शुक्र, केतू बुध
 १२.५३ ते १५.०० गुरु राहु शुक्र, केतू बुध
 १५.००ते १६.४८ शनी राहु शुक्र, केतू बुध
 १६.४८ ते १८.२५ शनी राहु शुक्र, केतू बुध
 १८.२५ ते १९.३१ गुरु राहु शुक्र, केतू बुध
 १९.३१ ते २०.०० गुरुगुरु  शुक्र, केतू बुध
 २०.०० ते २१.४३ मंगल, राहु गुरु  शुक्र, केतू बुध
 २१.४३ ते २३.४३ शुक्र, केतु गुरु  शुक्र, केतू बुध
 २३.४३ ते २.०० बुध गुरु  शुक्र, केतू बुध
 ०२.०० ते ०४.१३ चंद्र गुरु  शुक्र, केतू बुध
 ०४.१३ ते ०६.१७ रवी गुरु  शुक्र, केतू बुध

September 18, 2012

आजचे रुलिंग प्लॅनेट

आजचे रुलिंग प्लॅनेट ( मंगळ्वार, १८ सप्टेंबर २०१२)

 वेळ लग्न स्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी दिन स्वामी
०६.२५ ते ६.२९बुधमंगळ, राहुबुधचंद्र
०६.२५ ते ८.३१बुधमंगळ, राहुबुधमंगळ, राहु
०८.३१ ते १०.२५शुक्र, केतुमंगळ, राहुबुधमंगळ, राहु
१०.२५ ते १०.४३शुक्र, केतुमंगळ, राहुशुक्र, केतुमंगळ, राहु
१०.४३ ते १२.५७मंगळ, राहुमंगळ, राहुशुक्र, केतुमंगळ, राहु
१२.५७ ते १५.०३गुरुमंगळ, राहुशुक्र, केतुमंगळ, राहु
१५.०३ ते १६.५२शनीमंगळ, राहुशुक्र, केतुमंगळ, राहु
 १६.५२ ते १८.२९ शनी मंगळ, राहुशुक्र, केतु मंगळ, राहु
 १८.२९ ते २०.०४ गुरु मंगळ, राहु शुक्र, केतु मंगळ, राहु
 २०.०४ ते २१.२७ मंगळ , राहुराहु  शुक्र, केतु मंगळ, राहु
 २१.२७ ते २१.४७  मंगळ , राहु राहु  शुक्र, केतु मंगळ, राहु
 २१.४७ ते २३.४७ शुक्र, केतु राहु  शुक्र, केतु मंगळ, राहु

September 17, 2012

श्री गणेशप्राण प्रतिष्ठापना - पूजा

गणपतीच्या पूजेची एकवीस फुले



जास्वंदी  ,  पांढरे कमळ

मधुमालती ,   जाई

सोनचाफा , केवडा

बकुळ , सुपारी

उंडी , नागकेशर

मोगरा , धोतरा

कण्हेरी , प्राजक्त

चवई ,  नांदुरकी

गोविंद , मोहोर

 शतपत्र , नानाविध

तांबडे  कमळ

आजचे रुलिंग प्लॅनेट ( सोमवार, १७ सप्टेंबर २०१२)

आजचे रुलिंग प्लॅनेट ( सोमवार, १७  सप्टेंबर २०१२)

 वेळ लग्न स्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी दिन स्वामी
०४.२१ ते ६.२८रवीचंद्रबुधरवी
६.२८ ते ६.२९रवीचंद्रबुधचंद्र
६.२९ ते ०८.३५बुधचंद्रबुधचंद्र
०८.३५ ते १०.४६शुक्र, केतुचंद्रबुधचंद्र
१०.४६ ते १३.०१मंगळ, राहुचंद्रबुधचंद्र
१३.०१ ते १५.०७गुरुचंद्रबुधचंद्र
१५.०७ ते १६.५६शनीचंद्रबुधचंद्र
१६.५६ ते १८.३३शनीचंद्रबुधचंद्र
१८.३३ ते २०.०८गुरुचंद्रबुधचंद्र
२०.०८ ते २१.५१मंगळ, राहुचंद्रबुधचंद्र
२१.५१ ते २३.२३शुक्र, केतुचंद्रबुधचंद्र
२३.२३ ते २३.५१शुक्र, केतुमंगळ, राहुबुधचंद्र
२३.५१ ते ०२.०७बुधमंगळ, राहुबुधचंद्र
०३.०७ ते ४.२१चंद्रमंगळ, राहुबुधचंद्र

September 16, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥८॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥८॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥







अर्थ : - एका तत्वज्ञान्याने म्हटले आहे की, जन्माला आलास तेव्हा तू रडत होतास आणि इतर माणसे हसत होती. जन्मभर असा वाग की, तू मरताना इतर लोक रडत असतील, आणि तू हसत असशील. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाची शक्ती सतत जात असते. माणूस सतत म्हातारा होत असतो. तो द

ुर्बख होत असतो. झिजत असतो. हे जर खरे, तर मग ते झिजणे स्वार्थासाठी का म्हणून? एकादा चोर ’ चोरी’ करून तुरूंगात गेला तर त्याचे कोणी कौतुक करीत नाही पण तो चार जणांच्या कामासाठी, देशासाठी तुरूंगात गेला तर त्याचे कौतुक होते. त्याच्या कुटुंबाला समाज नाना तऱ्हेची मदत करतो. नि:स्वार्थ हा एक प्रकारचा उत्कृष्ट स्वार्थ आहे. कारण त्याने कालांतराने स्वार्थ साधतो आणि त्यात नि:स्वार्थाचे चालू सुखही मिळते. नि:स्वार्थामध्ये थोडे कष्ट पडले, तरी त्यातून तीन फायदे होतात. मन शांत राहते. नंतर नि:स्वार्थ कामाचे कौतुक होते आणि अखेर भौतिक लाभही काही कमी पडतो असे नाही. मात्र या गणिती हिशेबाचा नि:स्वार्थ नसावा. खरीखुरी, कळकळीची शंाती आणि नि:स्वार्थ असावा.

Motivational Quote of the Day

"The bad news is time flies. The good news is you're the pilot."
Michael Altshuler


आजचे रुलिंग प्लॅनेट ( रविवार , १६ सप्टेंबर २०१२)



 वेळ लग्न स्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी दिन स्वामी
 ०४.२४ ते ६.२८ रवी रवी रवी शनी
 ६.२८ ते ०६.३३ रवी रवी रवी रवी
 ०६.३३ ते ०८.२३ बुध रवी रवी रवी
 ०८.३३ ते ०८.३९ बुध रवी बुध रवी
 ०८.३९ ते १०.५० शुक्र, केतु रवी बुध रवी
 १०.५० ते १३.०५ मंगळ, राहु रवी बुध रवी
 १३.५ ते १५.११ गुरु रवी बुध रवी
 १५.११ ते १७.०० शनी रवी बुध रवी
 १७.ऊ ते १८.३७ शनी रवी बुध रवी
 १८.३७ ते २०.१२ गुरु रवी बुध रवी
 २०.१२ ते २१.५५ मंगळ, राहु रवी बुध रवी
 २१.५५ ते २३.५५ शुक्र, केतु रवी बुध रवी
 २३.५५ ते ०१.१२ बुध रवी बुध रवी
 ०१.१२ ते ०२.११ बुध चंद्र बुध रवी
 ०२.११ ते ०४.२४ चंद्र चंद्र बुध रवी

September 15, 2012

Motivational Quote of the Day


"Wise sayings often fall on barren ground; but a kind word is never thrown away."
Sir Arthur Helps

आजचे रुलिंग प्लॅनेट ( १५ सप्टेंबर २०१२ )

आजचे  रुलिंग प्लॅनेट  ( १५  सप्टेंबर २०१२ )

 वेळ लग्नस्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी दिन स्वामी
०४.२८ ते ६.२८रवीशुक्र केतुरवीशुक्र, केतु
०६. २८ ते ६.३६रवीशुक्र केतुरवीशनी
०६.३६ ते ८.४३बुधशुक्र केतुरवीशनी
०८.४३ ते १०.५४शुक्र, केतुशुक्र केतुरवीशनी
१०.५४ ते १३.०९मंगळ, राहुशुक्र केतुरवीशनी
१३.०९ ते १५.१५गुरुशुक्र केतुरवीशनी
१५.१५ ते १७.०४शनीशुक्र केतुरवीशनी
१७.०४ ते १८.४१शनीशुक्र केतुरवीशनी
१८.४१ ते २०.१५गुरुशुक्र केतुरवीशनी
२०.१५ ते २२.००मंगळ, राहुशुक्र केतुरवीशनी
२२.०० ते ००.०३शुक्र, केतुशुक्र केतुरवीशनी
००.०३ ते ०२.१५बुधशुक्र केतुरवीशनी
०२.१५ ते ०२.४५चंद्रशुक्र केतुरवीशनी
०२.४५ ते ४.२४चंद्ररवीरवीशनी

September 14, 2012

पांढरा बुधवार - महती ( श्री लक्ष्मी व्रत )



 आमच्या स्नेही  सौ  उमा नेने यांनी  ५ बुधवार व्रत  केले आणी त्यांना आलेला 
अनुभव   इमेल द्वारे  कळवला.   यात त्यांनी बुधवारचे व्रत कसे करावे हे सांगितले आहे
 हा त्यांचा अनुभव वाचकांना ही उपयोगी  पडेल म्हणून इथे देत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

uma nene
11:52 PM (9 hours ago)


to me
नमस्कार
मी गायिका आहे.मी हिंदी मराठी गाण्याचे कार्यक्रम करते.सध्या मी वन वूमन शो करत आहे.कारओके software वर.मी माले वोईचे मध्ये गाऊ शकते.लहान मुलाच्या आवाजात गाऊ शकते.आणि खूप आवाजात गाऊ शकते.मी ८ वर्ष लंडन ,सिंगापूर ,अबुधाबी इ ,ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले होते.माझे गायनाचे  क्लास आहेत.
संकट कधी कुठे कशी येतील काही सांगता येत नाही.तसच काहीस माझ्याबाबतीत घडलं.नशिबाची साथ होती म्हणून थोडक्यात ते संकट संपलं.ते मला तुमच्याबरोबर शेअर  करायला आवडेल.
माझ  ICICI बँकेत account होत ,मुलाच्या admission साठी तिथे मी काही पैसे ठेवले होते.आणि बाकी काही अजून रक्कम ही होती.जिला आम्ही हात लावायचा नाही असं ठरवलं.नेट बँकिंग account एकदा सहज check केल आणि मला heart attack कसा काय नाही आला.कोणीतरी माझ्या
account hack करून ७५००० रुपये काढले होते.काहीच सुचत नव्हत.fir केल.बँकेत भेटी सुरु झाल्या ,रात्ररात्र झोप नाही.माझ्या भावाने त्या माणसाचा शोध लावला ,तो IT वाला आहे त्यामुळे त्याने लगेच शोध सुरु केला.आणि त्यात त्याला यश आलं.कोणी पैसे घेतले आहेत ते कळल.त्या माणसाला phone सुरु झाले .त्याकाळात सगळे माझ्या पाठीशी होतेच.आई म्हणाली जर त्या माणसाने पैसे दिले तर ५ पांढरे बुधवार करीन असं म्हण.मी लागेच तसं mhanatala .८ महिन्यांनी त्या माणसाने सगळे पैसे ,मागे लागून धमक्या देऊन ,परत केले .जीवात जीव येणे म्हणजे काय असतं ते तेव्हां मला कळल.
आईनी मला आठवण करून दिली संकटकाळी आपण जे काही नवस बोलतो ते लगेच फेडावेत.
मग मी ५ पांढरे बुधवार चातुर्मासात सुरु केले आणि १२ सेप्ट.ला उद्यापन केल.हे उपास केल्याने खूप चांगले अनुभवही आले.समाधान मिळालं.हे लक्ष्मीचे उपास आहेत.ज्याला जमेल त्यांनी नक्की करावेत.ते कसे करावेत ते ही सांगते.पहिल्या बुधवारी जे पांढर खाल तेच ५ ही बुधवार खायचे.salt अजिबात खायचं नाही.आळणी  उपास करावयाचे.दुध केळ,साबुदाणा खीर .संध्याकाळी हात पाय धुवून अन्नपूर्णा देवीला दुध /पंचामृत ,पाणी असे स्नान घालावे.एक पांढर फुल वाहाव.जे ५ बुधवार तेच वाहता येईल.सहज मिळेल असे.हळद कुंकू वाहाव .दुधसाख्रर ठेवावी प्रसाद म्हणून.नमस्कार करावा.आणि १०८ वेळा -ओम श्री शुक्ला महा शुक्ले निवासे ,श्री महालक्ष्मी नमो नमः .हा मंत्र म्हणावा .पुजेची वेळ १च ठेवावी ७ ते ८ च्या दरम्यान.मग उपास सोडवा गरम भात व दुध ,दही.salt नाही.कमी बोलावे.तसेच दिवसभर पांढरे वस्त्र घालावे

महिलांना अडचण आल्यास उपास करावा पण तो बुधवार धरू नये.
उद्यापनाला सकाळपासून उपास करावा . सवाष्ण बोलवावी तिची ओटी भरून पांढर कापड ,पांढरी वस्तू ,गजरा असं द्याव.नमस्कार करावा.पूजा जी आपण केली ती पुजा करायची.नैवेद्य दाखवायचा .सगळा नेहमीचा स्वयपाक करायचा.खीर  व पक्वान्न पांढर असावयास हव .(शेवयाची खीर,मोदक इत्यादी ).नैवेद्याच ताट तिला द्याव.मग आपण उपास सोडावयास बसाव.
मला जसे ह्या  उपासाचे फळ मिळाले तसेच तुम्हालाही मिळेलअनुभव सांगते थोडक्यात ;.न होणारी काम अचानक वेग घेतात,तब्येतीच्या तक्रारी संपतात ,भरभराट होते.
खूप छान वाटतय मला हे शेअर करायला.धन्यवाद,
कळावे
आपली
सौ.उमा नेने

आजचे रुलिंग प्लॅनेट ( १४ सप्टेंबर २०१२ )

आजचे  रुलिंग प्लॅनेट  ( १४ सप्टेंबर २०१२ )

 वेळ लग्नस्वामी नक्षत्र स्वामी राशी स्वामी दिन स्वामी
 ४.३२ ते ६.२८  रवी केतु रवीगुरु 
६.२८  ते ६.४० रवी  केतु  रवी शुक्र, केतु
 ६.४० ते ०८.४७ बुध  केतु   रवी शुक्र, केतु
 ०८.४७ ते १०.५८ शुक्र, केतु  केतु   रवी शुक्र, केतु
 १०.५८ ते १३.१२ मंगळ, राहु  केतु   रवी शुक्र, केतु
 १३.१२ ते १५.१९ गुरु  केतु   रवी  शुक्र, केतु
 १५.१९ ते १७.०८ शनी  केतु   रवी  शुक्र, केतु
 १७.०८ ते १८.४५ शनी  केतु   रवी  शुक्र, केतु
 १८.४५ ते २०.१९ गुरु  केतु   रवी  शुक्र, केतु
 २०.१९ ते २२.०३ मंगळ, राहु  केतु   रवी  शुक्र, केतु
 २२.०३ ते ००.०७ शुक्र, केतु  केतु   रवी  शुक्र, केतु
 ००.०७ ते २.१९ बुध   केतु   रवी  शुक्र, केतु
 २.१९ ते ३.५३ चंद्र  केतु   रवी  शुक्र, केतु
 ३. ५३ ते ४.२८ चंद्र शुक्र, केतु   रवी  शुक्र, केतु

September 13, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥७॥



मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥




अर्थ : - माणसाचा घात भित्रेपणाने जेवढा केला असेल तेवढा दुसऱ्या कशानेही केला नसेल. माणूस जर खरे बोलायला भिणार नाही, असुखाला भिणार नाही. भुकेलासुध्दा भ्यायचे नाही का? हा प्रश्र्न चटकन सोडवता नाही आला, तरी त्यातले भिणे संपवले पाहिजे. भुकेचे दु:ख जावे म्हणून प्रयत्न करावा. पण त्य

ातून भीती उणी करावी. भीती आणि प्रयत्न यात पुष्कळ फरक आहे. प्रयत्न चालू ठेवाव आणि भिणे संपवत आणावे. श्री रामदासांना सातव्या श्लोकात याच जातीने श्रेष्ठ धारीष्ट्य हवे आहे. या खालोखाल त्याच जातीची त्यांची सूचना निंदा सोसण्याची आहे. धारीष्ट्य उंच असावे, ते किती उंच? तर नीचातल्या नीच माणसाने बोललेले अपशब्दसुध्दा, त्या उंचीवर घायाळ करू शकणे अशक्य व्हावे. निंदा सोसणे, हेच मुळी एक उच्च प्रकारचे धैर्य आहे आणि या अर्थाने पहिली ओळ आणि दुसरी ओळ एकाच मतलबाची म्हणता येईल. वास्तविक व्यवहारात होते असे की, लोकांचे खरे बोलणेचे आपल्याला निंदेसारखे वाटत असते. आपण चुकलो माणसाला कधी सहन होत नाही आणि मग तो दुसऱ्याने सांगितलेल्या सत्यालाच ’निंदा’ म्हणू लागतो. यावर स्वामी रामदासांनी मेख मारून ठेवली की, मुळात तू खोटी निंदासुध्दा सहन करायला शीक. निंदेलासुध्दा तुझे उत्तर नम्र असावे, त्याने लोक संतुष्ट होतील. आत्मविचार प्रवृत्त होतील आणि केव्हातरी त्यांचेही कल्याण होईल. कानावर पडेल ती निंदा असह्य मानली आणि हात उगारला, तर व्यवहारात कधी शेराला सव्वाशेर भेटतात. पूर्वी उचलेला हातही कापला जातो.

आजचे रुलिंग प्लॅनेट ( गुरुवार , १३ सप्टेंबर २०१२ )

आजचे रुलिंग प्लॅनेट ( गुरुवार , १३ सप्टेंबर २०१२ )

 वेळ लग्नस्वामीनक्षत्र  स्वामीराशी  स्वामी दिनस्वामी
४.३६ ते ६.२८रवीबुधचंद्रबुध
६.२८ ते ६.४४रवीबुधचंद्रगुरु
६.४४ ते ८.५१बुधबुधचंद्रगुरु
८.५१ ते ११.०२शुक्र, केतुबुधचंद्रगुरु
११.०२ ते १३.१६मंगळ, राहुबुधचंद्रगुरु
१३.१६ ते १५.२३गुरुबुधचंद्रगुरु
१५.२३ ते १७.१२शनीबुधचंद्रगुरु
१७.१२ ते १८.४९शनीबुधचंद्रगुरु
१८.४९ ते २०.२३गुरुबुधचंद्रगुरु
२०.२३ ते २२.०७मंगळ, राहुबुधचंद्रगुरु
२२.०७ ते ००.११शुक्र केतुबुधचंद्रगुरु
००.११ ते २.२३बुधबुधचंद्रगुरु
०२.२३ ते ०.४ २८चंद्रबुधचंद्रगुरु
०४.२८ ते ०४.३२चंद्रकेतुरवीगुरु

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या