September 2, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥५॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥५॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥







अर्थ : - रामदासांनी पाचव्या श्लोकात प्रथमच पाप सोडून द्यायला संागितले आहे. पापच नव्हे, तर पापाचा संकल्पसुध्दा. आता नुसते पाप नको म्हणून भागत नाही, ती एक नकारी कल्पना झाली. पाप न करणारा मनुष्य पुष्कळ वेळा भीतीने पाप करत नाही. पाप करण्यालासुध्दा धाडस लागते आणि त

े नसल्यामुळे कित्येक माणसे पाप करीत नाहीत. ऊर लोंबत असलेला शेंदरी कलमी आंबा घ्यावासा वाटतो. जिभेला पाणी सुटते. पण झाडावरही चढता येत नाही आणि नेमही लागत नाही. मग ढोंगी माणूस स्वत: म्हणतो, अरे, दुसऱ्याच्या बागेतला आंबा चोरू नये. आता या ढोंगी माणसाला पाप सोडल्याचे श्रेय मिळेल का? मुळीच मिळणार नाही. कारण त्याने मनाने आंबा खाल्ला आहे. शरीराच्या कब्जात तो आंबा आला नाही हा त्याचा चांगुलपणा नसून नाईलाज होता.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या