September 19, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥९॥

॥ श्री मनाचे श्लोक ॥९॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥९॥





अर्थ : - प्रया मनाचा आराखडा मनाच्या आठव्या श्लोकापर्यंत काढला. आता आणखी भावी काळाचाही नवा विचार रामदासांनी पुढे ठेवला आहे. चैन करून पैसे उधळीत राहणारा मनुष्य, पुढल्या पिढीबद्दल बेफिकीर राहतो, बापाचे कर्ज मुलाला फेडावे लागते. आणि धर्माच्या सांगीप्रमाण

े मुलाचा हा उपकार अति कष्ट करून कोठेतरी या माणसाला फेडावा लागतोच. म्हणजे या जन्मात भोगलेली चैन म्हणजे एक तऱ्हेने तुम्ही पुढल्या पिढीचे कर्जच काढीत असता आणि ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला तिसऱ्या पिढीत जन्म घ्यावा लागतो. सुख आणि दु:खाचा खो खो खेदाचा गुणाकार होत राहतो. शेजाऱ्याचे कर्ज काढणे ही अति पापबुध्दी झाली. या अति स्वार्थाबुध्दीचे मंाजर डोळे मिटून दूध पिते, तेव्हां पुढल्या कष्टाचा बडा बडगा, भवितव्याच्या पोकळीत खडा राहात असतो. दुसऱ्या ओळीत ’ अतिस्वार्थवृत्ती’ चा आविष्कार रामदासांनी केला आहे! आणि म्हणून तिसऱ्या ओळीत म्हटले आहे की, जे दु:ख भोगाला आले, ते त्यावेळी भोगून न टाकणे हे वर्तन खोटे आहे. पुढे चौथी ओळ म्हणते, खोट्या कर्मामुळे मनासारखे होत नाही, आणि छोटे दु:ख टाळायला गेलो, तर मोठे दु:ख येऊन उभे राहते. एबर्टने म्हटले आहे, इच्छाभोगाने नव्हे तर इच्छेचा त्याग करूनच शांती मिळेल. आणि हा इच्छात्याग इतका निर्विकल्प असला पाहिजे की, संत तिरूवल्लर म्हणतात, ’ अशा त्यागी माणसांची स्तुतीसुध्दा करणे शक्य नाही, ज्याप्रमाणे आजवर मेलेल्या माणसांची संख्या सांगणे शक्य नाही’.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या